जेवण झाल्यावर मी थोडा वेळ टीव्ही बघत होतो, आणि माझ्या समोर एक डिश पेश केली गेली! नंतर समजले की जे खोबरे खिसने चालू होते ते एका डिश ची तयारी होती. इती: श्रीधर!
डिशचे नाव: भेंडी खिचडी!!! :) :) (डीशचे पूर्ण कान्पोजिशन त्याने पुढे दिले आहे)
1. हे ओले खोबरांना असं खसखस बारीक खिसुन घ्या.
2. मंगना मी त्यात थोडी बडीशेप टाकली.
3. आणी एक मोठा चमचा मीठ टाकयंच हां.
4. आता अजुन काय? त्यात आता पापडाचा चुरा टाकला.
5. मसाले भात!
6. आई थोडी साखर दे...
7. आणि मी काय गंमत केली सांगू? ... मी ना आत जाउना त्यात थोडे शेंगदाणे टाकले आणि झाली ....... भेंडी खिचडी!!!
(इथे भेंडीचे काही माहीत नाही मात्र खिचडी नक्कीच तयार झाली होती!!)
असे प्रसंग कधी कधीच येतात आणि ते कुठेतरी साठवून ठेवावे असे असतात. त्याचाच हा प्रयत्न. मी इथे आमच्या भेंडी खिचडीचा फोटो जोडत आहे.